Wednesday 12 April 2023

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा कार्यालयाच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन

 


 

        जालना, दि. 12 (जिमाका) :-  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने दि.17 सप्टेंबर 2022 ते 16 सप्टेंबर 2023 या कालावधीत विविध उपक्रम राबविण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी विविध तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धेत व कार्यक्रमात खेळाडू, क्रीडा संघटना, नागरिक, महिला, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जिल्हा क्रीडा कार्यालय, जालना यांच्यातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून दि.20 एप्रिल 2023 रोजी जिल्हा क्रिडा संकुलावर सकाळी 6.30 वाजता सायकल रॅली, दि.21 जुन रोजी योग‍ दिन आणि दि.10 ते 17 सप्टेंबर या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुकास्तरावर या स्पर्धां उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे (मो.7588169493 ) यांच्याशी संपर्क साधावा. असेही कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment