Thursday 6 April 2023

जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 12 एप्रिल रोजी शिकाऊ उमेदवारीसाठी भरती मेळावा

 

बिगर अभियांत्रिकी व्यवसाय उत्तीर्ण उमेदवारांना आवाहन


 

         जालना दि. 6 (जिमाका) :-   मराठवाडा विभागातील बिगर अभियांत्रिकी व्यवसायामध्ये  फॅशन डिझाईन अॅन्ड टेक्नोलॉजी, ड्रेस मेकिंग, सुंईग टेक्नोलॉजी  या व्यवसायातील आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे बुधवार दि. 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जालना येथील मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र यांच्याकडून आयोजित केलेल्या शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्यात बिगर अभियांत्रिकी व्यवसायातील उत्तीर्ण उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन  अंशकालिन प्राचार्य पी. डी. उखळीकर यांनी केले आहे.

शिकाऊ भरती मेळाव्यात अमरावती येथील नामांकित कंपनी टेक्नोक्राफ्ट फॅशन लिमिटेड ही आस्थापना सहभागी होणार आहे. दि. 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता जालना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत येथे येणार असून मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी (मुले/मुली) शिकाऊ उमेदवारीची संधी मिळणार आहे. उमेदवारांनी आपली नोकरी पक्की करावी व आपल्या कुटूंबाचा आधार बनावे. या भरती मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी येतांना शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. तरी संबंधित व्यवसायातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. असेही सहप्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र (बीटीआरआय), जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment