जालना दि. 9 (जिमाका) :- सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतूदीनूसार जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी जून 2023 या अखेर आपल्या वेतन पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहिती ई-आर 1 विवरणपत्र 31 जानेवारी 2024 पर्यंत www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग / व्यवसाय / महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील 25 किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखाने यांना सेवायोजन कार्यालये ( रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे ) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 नुसार त्रैमासिक विवरणरपत्र ई-आर 1 माहे डिसेंबर 2023 तिमाही संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत म्हणजेच दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.
नियोक्त्यांच्या
लॉग-इनमध्ये
विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा
उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी याप्रमाणे
नियोक्त्यांची जून 2023 या
तिमाहीचे
विवरणपत्र ई-आर 1 दि. 31
जानेवारी 2024
पर्यंत सादर
करावे. यासाठी
www.rojgar.mahaswayam.gov.in वेबसाईट ओपन करुन, एम्प्लॉयर (लिस्ट अ जॉब ) वर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉग इनमध्ये नियोक्त्यांचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ईआर रिपोर्ट मधील ई-आर 1 या ऑप्शनवर क्लिक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. माहिती भरतेवेळी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोजी सार्वजनिक सुट्या वगळून सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेपर्यत (02482) 299033 या कार्यालयाच्या दुरध्वनीवर संपर्क साधावा. तिमाहीचे विवरणपत्र ई-आर 1 सादर करण्यास कसूर झाल्यास कसूरदार आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment