Thursday 4 January 2024

“विकसित भारत संकल्प यात्रेच्या” माध्यमातून शासकीय योजना गावोगावी

 

 

 

 

जालना, दि. 4 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा”  सध्या जालना जिल्ह्यात सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या लोकल्याणकारी योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. शासकीय योजना गावागावांत नेणाऱ्या या  “विकसित भारत संकल्प यात्रे” ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.  

शुक्रवार, दि. 5 जानेवारी रोजी पुढील गावात जाणार “विकसित भारत संकल्प यात्रा - विकसित भारत संकल्प यात्रा शुक्रवार, दि. 5 जानेवारी 2024 रोजी बदनापूर तालुक्यातील चिखली व वाघरुळ दा., भोकरदन तालुक्यातील दावतपूर व टाकळी भोकरदन, जालना तालुक्यातील निरखेडा व भिलपूरी, अंबड तालुक्यातील झोडेगाव व चिंचखेडा, परतूर तालुक्यातील सावंगी गंगाकिनारा व गोलेगाव, घनसावंगी तालुक्यातील आवलगाव बु. व गुरु पिंपरी येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील.

विकसित भारत संकल्प यात्रेस ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment