Wednesday 10 January 2024

तहसील कार्यालयातून विविध योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना आवाहन

 


 

जालना, दि. 10 (जिमाका) :- संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती  वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड अपडेट (मोठी प्रिंट), आधार क्रमांक बँक खात्याला संलग्न केल्याची केवायसी पावती व मोबाईल क्रमांक हे कागदपत्र सादर केल्याशिवाय लाभ देता येत नाही त्यामुळे जालना शहर येथील लाभार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्र तहसिल कार्यालय जालना संजय गांधी शहर विभाग येथे सादर करावे. जेणेकरुन पात्र लाभार्थी यांचा लाभ सुरळीत होण्यास अडचण येणार नाही. अशी माहिती तहसीलदार, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना. या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न केल्यानंतरच अर्थसहाय्याचे वाटप करण्याबाबत  शासन निर्णयान्वये कळविण्यात आले आहे. जालना शहर येथील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांनी दि. 15 जानेवारी 2024 पर्यंत आधार क्रमांक बँक खात्याला संलग्न करावे व त्याची छायांकित प्रत तहसील कार्यालय जालना येथे जमा करावी. असेही कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment