Monday 8 January 2024

नेहरु युवा केंद्रव्दारे 10 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेचे आयोजन

 


 

    जालना, दि. 8 (जिमाका) :-   भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र जालना व राष्ट्रीय सेवा योजना व्दारा जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेचे आयोजन दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रमाता इंदिरा गांधी, महाविद्यालय, जालना येथे करण्यात आले आहे.   मेरा भारत- विकसित भारत @ 2047   या विषयावर ही भाषण स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धेचे नियम व अटी पुढील प्रमाणे आहे.  वयोगट –  दि. 12 जानेवारी 2024 रोजी 15 ते 29 वर्ष,  भाषा : हिन्दी/ इंग्रजी / मराठी, तसेच स्पर्धक हा जालना जिल्हयातील रहिवासी असावा. जिल्हास्तरीय स्पर्धेतील पथम विजेता स्पर्धक हा राज्यस्तरीय स्पर्धेकरीता पाठविण्यात येणार आहे. या जिल्हास्तर स्पधेकरीता प्रथम, व्दितीय व तृतीय बक्षीस म्हणून स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र  तसेच सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राज्यस्तरावर प्रथम बक्षीस रुपये 100000/- व्दितीय रुपये 50000/- व तृतीय बक्षीस (दोन स्पर्धकांकरीता) रुपये 25000/- असे आहे.  नांव नोदणी करीता अंतिम तारीख दि. 9 जानेवारी 2024 असून अधिक माहितीसाठी  इच्छुकांनी नेहरु युवा केंद्र, जालना मो.क्र.7875464703 येथे संपर्क साधावा.

तरी जास्तीत जास्त स्पर्धेकांनी या जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी नेहरु युवा केंद्र जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment