Wednesday 10 January 2024

युवा दिनानिमित्त युवा सप्ताहाचे आयोजन; शाळा, महाविद्यालयांना सहभागी होण्याचे आवाहन

 


जालना दि. 10 (जिमाका) :- दरवर्षी प्रमाणे दिनांक 12 ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना मार्फत विविध शाळा व महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने युवा दिन युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

केंद्र शासनाच्या योजनेद्वारे संपूर्ण भारतामध्ये स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस 12 जानेवारी हा युवा दिन म्हणून व त्यानिमित्ताने 12 ते 19 जानेवारी 2024 हा कालावधी युवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. देशाची सर्वांत मोठी शक्ती ही युवा शक्ती असून युवकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना विकसित करण्यासाठी व 15 ते 35 वयोगटातील युवकासाठी एक संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे करण्यात येतो. अधिक माहितीसाठी युवा सप्ताह कार्यक्रम प्रमुख अधिकारी श्रीमती रेखा परदेशी यांच्याशी 9022951924 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment