Wednesday 10 January 2024

राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त वाहतुकीच्या मार्गात बदल

 


जालना, दि. 10 (जिमाका) :- बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा दरवर्षी दि. 12 जानेवारी 2024 रोजी मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो. सोहळ्यास देशभरातून तसेच राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येत असतात  तसेच या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय, सामाजिक संघटनांचा सहभाग असतो. या सोहळ्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असून जड वाहनांच्या रहदारीमुळे अपघात घडू शकतो त्यासाठी जनतेच्या सुरक्षीततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 सी मार्गावरील  जालना- नाव्हा-सिंदखेड राजा रोडवरील सर्व प्रकारची जड वाहतुक दि.11 जानेवारी 2024 रोजीचे रात्री 12.01 मिनिटांनी ते दि. 13 जानेवारी 2024 रोजीचे  रात्री 12.30 मिनिटांपर्यंत  पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश प्रभारी पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी जारी केले आहेत.

पुढीलप्रमाणे सर्व प्रकारच्या जड वाहतुकीस नमुद पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सध्याचा प्रचलीत मार्ग - अंबड रोड, मंठा रोड, भोकरदन रोड व औरंगाबाद कडुन येणारी जड वाहतुक ही जालना नाव्हा चौफुली येथून सिंदखेड राजा मार्गे मेहकर- वाशिमकडे जाणाऱ्या  वाहतुकीस पर्यायी मार्ग कन्हैय्यानगर जालना - देऊळगाव राजा मार्गे चिखली मेहकर -वाशिमकडे जाईल तर अंबड रोड, मंठा रोड, भोकरदन रोड व छत्रपती संभाजीनगरकडून येणारी हलकी वाहतुक ही जालना - नाव्हा चौफुली येथून सिंदखेड राजा मार्गे किनगांव राजा, दुसरबीड, बीबी, लोणारकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कन्हैया नगर जालना- देऊळगाव राजा मार्गे चिखली - मेहकर - वाशिमकडे किंवा कन्हैय्यानगर जालना-देऊळगांव राजा मार्ग अंढेरा- मलकापूर पांग्रा मार्गे दुसरबीड-मेहकर मार्गे वाशिम असा पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment