Monday 8 January 2024

जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांचे आवाहन

 


 

      जालना, दि. 8 (जिमाका) :-   जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जालना व डिजिटल उपकेंद्र, घनसावंगी या कार्यालयात  उपलब्ध असलेल्या विविध साहित्य प्रकारातील सुमारे 1 लाख 30 हजार  ग्रंथांची विहीत नमुन्यातील  एम एस एक्सल सीटमध्ये नोंद करण्यात येणार आहे.  यासाठी पुरवठादार व्यक्ती/संस्थाकडून दरपत्रक मागविण्यात आले आहे.

             जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय जालना तसेच  डिजिटल उपकेंद्र घनसावंगी येथे वाचकांसाठी विविध प्रकारचे वाचन साहित्य उपलब्ध आहे.  सदर साहित्याची जतन व्हावे वाचकांसाठी ही साहित्य सामुग्री कायम राहावी यासाठी शासनाच्या वतीने सदर साहित्य सामग्रीची  संगणकीय नोंद घेतली जाणार आहे. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक,  दिनांक 30/09/2020 व ग्रंथालय संचालनालयाचे परिपत्रक दि. 20 जानेवारी2023  नुसार मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जालना व डिजिटल उपकेंद्र, घनसावंगी येथील कार्यालयात उपलब्ध असलेल्या सुमारे 1,30,000 ग्रंथ संपदेची विहीत नमुन्यातील विवरणपत्रात  एम एस एक्सल शीटमध्ये ऑफलाईन पध्दतीने नोंद करावयाची आहे. त्या अनुषंगाने ग्रंथांची नोंदणी (डेटा एन्ट्री) करणे, बारकोड लेबलचे स्टीकर लावणे, ग्रंथ संग्रहाची दाखल नोंद क्रमाने कपाटांमध्ये मांडणी करणे इत्यादी कामे करावयाची आहेत. सदर काम बाह्य यंत्रणेकडून करावयाचे असून, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन परिपत्रकांमध्ये नमूद सूचनांचे अधीन राहून, केवळ करार पध्दतीने काम करुन देण्यास इच्छुक असलेल्या अनुभवी कंत्राटदार संस्था अथवा व्यक्तीकडून खालील अटी व नियमांच्या अधिन राहून दरपत्रक मागविण्यात येत आहे.

                 सदरचे काम करण्याचा अनुभव असलेल्या व्यक्ती/संस्थांनी मोहोरबंद लिफाफ्यामध्ये आपले दरपत्रक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जालना या कार्यालयास दि. 15 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावे. विहीत मुदती नंतर प्राप्त झालेल्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. निविदा मंजुर करणे अथवा नाकारणे अथवा निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जालना यांचेकडे राखून ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी दिली आहे.                                                                                

                                                                                            

 

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment