Friday 11 November 2022

किमान कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत मोफत कौशल्य प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करावेत

 


             जालना दि. 11 (जिमाका) :-  जिल्ह्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करून त्यांना अधिक मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार  स्वंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2022-23 या योजनेंतर्गत पात्रताधारक व इच्छुक असलेल्या युवक-युवतींना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील रोजगार इच्छूक युवक-युवतींनी मोफत देण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी https://bit.ly/3UEq7fu या गुगल फॉर्म लिंकवर ऑनलाईन नोंदणी  करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले.

        कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीमार्फत जालना जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्याकरिता शासनाकडून सूचिबध्द प्रशिक्षण संस्थांची प्रशिक्षण केंद्र म्हणून निवड करण्यात येणार आहे. समितीने निवड केलेल्या सदर प्रशिक्षण केंद्रामार्फत सेरीकल्चरिस्ट (272 तास, शिक्षण 5 वी पास ), गार्डन कम नर्सरी रायझर (470 तास, शिक्षण 5 वी पास), क्वालिटी सिड ग्रोवर (380 तास, शिक्षण 10 वी पास),  टू व्हिलर सर्विस टेक्नीशियन (480 तास, शिक्षण 10 वी पास), ब्युटी थेरपिस्ट (450 तास, शिक्षण 10 वी पास), सीएनसी ऑपरेटर टर्निंग (300 तास, शिक्षण 10 वी पास ), मॅन्युअल मेटल आर्क वेल्डींग (400 तास, शिक्षण 8 वी पास),  फिटर फॅब्रिकेशन (500 तास, शिक्षण 10 वी पास), फिटर मेकॅनिकल ॲसेम्बली (500 तास, शिक्षण 10 वी पास), फील्ड टेक्निशियन एयर कंडीशनर (४00 तास, शिक्षण 12 वी पास), आयर्न ॲण्ड स्टिल मशिनिस्ट (600 तास, शिक्षण 10 वी पास ), कुरीअर डिलेव्हरी एक्झीकेटीव्ह (270 तास, शिक्षण 10 वी पास ), अनआर्म सिक्युरिटी गार्ड (160 तास, शिक्षण 8 वी पास), इलेक्ट्रीशियन डोमेस्टीक सोलुशन (360 तास, शिक्षण 10 वी पास ), स्पीड फ्रेम ऑपरेटर टेंटर अँड डॉफ्फर (300 तास, शिक्षण 5 वी पास), काऊंन्टर सेल एक्झीकेटीव्ह (564 तास, शिक्षण 12 वी पास), सेल्फ एम्प्लॉयड टेलर (360 तास, शिक्षण 8वी पास) व हॅन्डसेट रिपेअर इंजिनिअयर (300 तास, शिक्षण 12 वी पास) वरील अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यामध्ये किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2022-23 करिता 1095 उमेदवारांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

नोंदणी करण्यासाठी  इच्छुक उमेदवारांनी https://bit.ly/3UEq7fu गुगल फॉर्म लिंकवर ऑनलाईन नोंदणी करावी. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या www.facebook.com/JalnaSkillDevelopment या फेसबुक पेजवरही उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वरील गुगल फॉर्म ची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यालयाच्या jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर आपली नोंदणीसाठी माहिती सादर करावी, त्याचप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, २ रा माळा, जालना या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा 02482-299033 यादूरध्वनीवर संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment