Friday 11 November 2022

12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन

 


 

जालना दि. 11 (जिमाका) :-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना, जिल्हा न्यायालय, जालना व सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्याअंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम 138, एन. आय.अॅक्टची प्रकरणे, बँकेची वसूली प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीचे वादाची प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणे व इतर प्रकरणे तसेच दावा दाखलपूर्व प्रकरणे इत्यादी प्रकरणासाठी, शनिवार, दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी सर्व संबंधीतांनी या संधीचा फायदा घेवून आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोकअदालतमध्ये ठेवून तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन राजेश अहिर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी केले आहे.

                                                        - *-*-*-*-* -

No comments:

Post a Comment