Friday 11 November 2022

औरंगाबाद डाक विभागातील विमा एजंट पदासाठी 16 नोव्हेंबर रोजी थेट मुलाखती

 


जालना दि. 11 (जिमाका) :-  औरंगाबाद डाक विभागात डाक जीवन विमा  व ग्रामीण डाक जीवन विमा एजंट पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती केली जाणार असून या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी डाकघर अधिक्षक कार्यालय जुना बाजार औरंगाबाद येथे दि.16 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन डाकघर अधिक्षक, औंरगाबाद यांनी केले आहे.

पात्रतेसाठी उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षेदरम्यान असावे,  उमेदवार किमान दहावी अथवा केंद्र,राज्य सरकार मान्यताप्राप्त समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.  सुशिक्षित बेरोजगार, निवृत शिक्षक, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, माजी जीवन विमा सल्लागार,इतर विमा कंपन्याचे माजी अभिकर्ते,स्वयंरोजगारास  इच्छुक  असलेल्या उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल. व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विम्याबाबतचे ज्ञान,  संगणकाचे ज्ञान तसेच स्थानिक परिसराची माहिती इत्यादी बाबी आवश्यक आहेत.  निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवणे बंधनकारक आहे जी राष्ट्रीय बचत पत्र  किंवा किसान विकास पत्र स्वरुपात असेल.  प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात उमेदवारास परवाना देण्यात येईल, जो आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कायम स्वरुपाच्या परवान्यामध्ये रूपांतरित केला जाईल. इच्छुकांनी अधीक्षक, डाकघर, औरंगाबाद विभाग, जुना बाजार, औरंगाबाद 431001 यांचे कार्यालयात जन्म तारीख व शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठी लागणारे मुळ कागदपत्रे, त्या कागदपत्रांची एक साक्षांकीत प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड व दोन पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह नमुन्यातील अर्जासह दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.  नियुक्ती ही लायसन्स तसेच कमिशन तत्वावर असेल. असेही अधीक्षक डाकघर, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment