Tuesday 8 January 2019

लोकराज्यच्या ‘खेलो इंडिया’ विशेषांकाचे जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती थोरात यांच्या हस्ते प्रकाशन



           जालना, दि.8: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकराज्यच्या ‘खेलो इंडिया’ विशेषांकाचे जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती वैशाली थोरात यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
            यावेळी अप्पर कोषागार अधिकारी गणेश खोद्रे, माहिती सहाय्यक अमोल महाजन, राजेंद्र वाणी, अनिल परदेशी, आशा नरवडे, शाम मारवाडे उपस्थित होते.
            या विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्याक विकास व वक्‌फ मंत्री विनोद तावडे यांनी       8 ते 20 जानेवारी,2019 दरम्यान पुणे येथे होत असलेल्या खेलो इंडिया या उपक्रमाबद्दल संपादकीय मधून प्रकाश टाकला आहे. अंकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड,  सचिन तेंडुलकर यांच्यासह मान्यवरांनी खेळाबद्दलचे महत्व विषद केले आहे. 
            महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होत असलेला लोकराज्य हा अत्यंत वाचनीय असुन राज्य लोकसेवा व केंद्रीय लोकसेवा आयोगासह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अंक अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगत प्रत्येकाने लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहनही श्रीमती थोरात यांनी यावेळी केले.
*******



No comments:

Post a Comment