Wednesday 9 February 2022

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजने अंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांना e- KYC करण्याबाबत आवाहन

 


      जालना,दि. 9 (जिमाका) :-  जिल्हयातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  (पीएम किसान) पोर्टलवरील  नोंदणीकृत लाभार्थ्यांची  e- KYC करण्यासाठी विशेष जनजागृती मोहिम राबवून दि. 31 मार्च 2022 अखेरपर्यंत e- KYC  पुर्ण  करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला  प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व पात्र लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे e- KYC करण्यासाठी OTP किंवा बायोमॅट्रिक पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत.

     प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in  या वेबसाईटवरील Farmer Corner  या टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान ॲपद्वारे OTP द्वारे लाभार्थ्यांना स्वत: e- KYC प्रमाणीकरणे मोफत करता येईल.   ग्राहक सेवा केंद्र CSC  केंद्रावर e- KYC प्रमाणीकरणे बायोमेट्रिक पध्दतीने करता येईल. केंद्र शासनाकडुन ग्राहक सेवा केंद्र  CSC केंद्रावर बायोमेट्रिक पध्दतीने e-KYC प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमेट्रिक प्रमाणीकरणे दर 15 फक्त निश्चित करण्यात आला आहे. पी.एम. किसान योजने अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील  एप्रिलजुलै  2022 या कालावधीत लाभ प्राप्त होण्यापुर्वी e-KYC प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असुन दि. 31 मार्च 2022 अखेर पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment