Thursday 3 February 2022

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांनी केली रेशीम उद्योग पाहणी

 





 

     जालना दि. 3 (जिमाका) :-    बुधवार दि. 2 फेब्रुवारी 2022 रोजी  जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी  यांनी बठाण बु. तसेच रेवगाव जालना येथे प्रत्यक्ष भेट देऊन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत चालु असलेल्या रेशीम विकास योजनेच्या कामाची पाहणी केली. बठाण येथील सुभाष नारायण बागल यांच्या तुती बागेची पाहणी करुन मजुर उपस्थिती व चालु कामाची पाहणी केली मजुरांना  मस्टर पेमेंट वेळेवर त्यांचे बँक खातयामध्ये जमा होते का ? काही अडचणी आहेत का ? अशी विचारणा केली त्याबाबत मजुरांकडुन कामाचा मोबदला वेळेत बँक खात्यावर जमा होतो, काही तक्रार नाही असे उत्तर मिळाले. या भेटी दरम्यान सोबत उपजिल्हाधिकारी रोहयो रविंद्र परळीकर तसेच रेशीम झोन  सहा जे.के. पाटील मनरेगा ग्रामरोजगार सेवक, जीवन बागल हे उपस्थित होते.

   त्यानंतर चमुने रेवगाव येथे श्रीमती मुक्ताबा विश्वनाथ सातपुते यांच्या रेशीम किटक संगोपनाची पाहणी केली. तेथे उपस्थित सौ. चंद्रकला गणपत सातपुते यांनी लाभार्थ्यांना रेशीम शेतीपासुन मागील बॅच मध्ये रुपये 1 लाख 1 हजारचे रेशीम कोषांची विक्री केल्याचे सांगुन,रेशीम शेतीपासुन इतर पीकाच्या तुलनेत चांगले उत्पादन होत असल्याचे सांगितले.

     रेवगाव येथे उपस्थित शेतकरी सुभाष चव्हाण यांनी दि. 24 जानेवारी 2022 रोजी कर्नाटकातील रामनगरम येथील रेशीम कोष बाजारपेठेमध्ये 261.41 किलो ग्रॅम रेशीम कोषांची विक्री करुन त्यापासुन 1 लाख 81 हजार 157 रुपयाचे उत्पादन घेतल्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणले.

     जिल्हाधिकारी यांनी रेशीम उद्योग शेतक-यांना शाश्वत उत्पादन देणारा शेती व्यवसाय असुन केवळ 25 दिवसामध्ये शेतक-यांना एक लाख पेक्षा जास्त उत्पादन मिळत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी 22-23 तध्ये तुती लागवड करीता नोंदणी करावी व तुती रोपे तयार करण्यासाठी, फेब्रुवारी महिन्यात तुती रोपवाटीका करावी अशी सुचना केली. जालना जिल्ह्यास तुती लागवड रेशीम कोष उत्पादन, रेशीम कोष प्रक्रिया या सर्व झोनमध्ये नंबर 1 वर आणायचे असुन या करीता जिल्हा रेशीम कार्यालय, कृषी विभाग, वन विभाग, रोहयो विभाग यांची आढावा बैठक घेऊन आराखडा तयार करण्यात आला आहे असे जिल्हाधिकारी यांनी सुचित केले.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment