Friday 11 February 2022

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन वास्तुचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 12 फेब्रुवारीला लोकार्पण

 


                जालना, दि. 11 (जिमाका) -  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, सर्व्हे नं. ४८८ येथे उभारण्यात आलेल्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन वास्तुचे उदघाटन व लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवार दि. 12 फेब्रुवारी, 2022 रोजी सकाळी 11-30 वाजता दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती (धर्मादाय संघटना) चंद्रकांत वसंत भडंग, विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री कु. आदिती सुनिल तटकरे, धर्मादाय आयुक्त प्रमोद श्रावण तरारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे धर्मादाय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रदीप वामनराव कुलकर्णी व सहाय्यक धर्मादाय आयुक्त सुनील भिमराव माने यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment