Wednesday 9 February 2022

शासनाच्या विविध विकासकामांची माहिती रेल्वे डब्यांवर विकास कामांची माहिती घेऊन जालना येथुन धावली नंदीग्राम एक्सप्रेस

 



 

                जालना, दि. 9 (जिमाका) :-  वेळ मध्यरात्री 1 वाजताची. जालना रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्सप्रेस दाखल होते.  रोज येणाऱ्या नंदीग्राम आणि आज आलेल्या नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये वेगळाच बदल जाणवत होता. या रेल्वेतुन जालना येथुन प्रवासासाठी उभे असलेल्या प्रत्येक प्रवाशांच्या चेहऱ्यावर या बदलाचे भाव स्पस्ट दिसत होते.  नंदीग्राम एक्सप्रेस रेल्वेगाडी  ही छायाचित्रांनी सजलेली दिसत होती.  महाराष्ट्र शासनाने गत दोन वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती छायाचित्रासह नंदीग्रामच्या दोन्ही बाजुंनी रेखाटण्यात आली होती.

                मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने नुकतेच दोन वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केले असून सरकारने घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयाचे व लोकोपयोगी योजनांचा संदेश रेल्वेच्या डब्यावर प्रसारित केला आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी रेल्वेच्या डब्यांचा वापर करत या  माध्यमातून राज्य सरकारकडून आपला महाराष्ट्र आपले सरकार ही मोहीम राबविण्यात येत आहे.

       आपला महाराष्ट्र, आपले सरकार ही टॅग लाईन घेऊन विविध लोकोपयोगी योजनांचा अतिशय समर्पक संदेश रेल्वे गाड्यांच्या डब्यावर प्रसारित करण्यात आला आहे. शेती, क्रीडा, सामाजिक न्याय, आरोग्य, मोफत सातबारा, ई-पीक पाहणी, लसीकरण, चिंतामुक्त शेतकरी यासह विविध योजनांचा यात समावेश आहे. दोन वर्षात सरकारने विविध विकास कामे केली आहेत, त्याची माहिती नंदीग्राम एक्सप्रेसवर प्रदर्शित करण्यात आली आहे. दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची हा संदेश घेऊन या रेल्वे  धावणार आहेत.

       समृद्ध शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी राज्य शासन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे असून, गतवर्षी चक्रीवादळबाधित फळबागांसाठी पुनर्लागवड व पुनरुज्जीवन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच कोरोना महामारीमध्ये पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी पाच लाखाची मुदत ठेव योजना सुरु करण्यात आली असल्याचा संदेशही देण्यात आला आहे. चिंतामुक्त शेतकरी, मोफत सातबारा आता दारी येणार,    ई-पीक पाहणी नोंदणीही करता येणार या योजनांनाही येथे प्राधान्य देण्यात आले आहे.  लांब पल्ल्यांच्या रेल्वेंची यासाठी निवड करण्यात आली असुन मराठवाड्यात नंदीग्राम एक्सप्रेसच्या माध्यमातुन  योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. हा उपक्रम 1 फेब्रुवारी ते 1 मार्च या महिन्याभरात राबविण्यात येणार आहे.  

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment