Sunday 5 January 2020


जिल्हा माहिती कार्यालयात दर्पण दिन साजरा
            जालना, दि. 6 –  दर्पण दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात जालना येथे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल हाफीज,  जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष अंकुशराव देशमुख व माहिती सहायक अमोल महाजन  यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  
            या कार्यक्रमास जिल्ह्यातील वृत्तपत्राचे संपादक, जिल्हा प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी  आदींनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 





No comments:

Post a Comment