Thursday 23 January 2020


प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते
मुख्य शासकीय ध्वजारोहण
            जालना, दि. 23भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या  70  व्या वर्धापन दिनानिमित्त दि. 26 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 9-15 वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  राजेश टोपे यांच्या हस्ते होणार आहे.
            तत्पुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रंगाणात जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या हस्ते सकाळी 8.15 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
            या कार्यक्रमास सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था आदीमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित रहावे, असे उपजिल्हाधिकारी, (सामान्य प्रशासन) जालना यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment