Tuesday 7 January 2020


प्रजासत्ताक दिन पूर्वतयारीचा उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
            जालना, दि. 7 – प्रजासत्ताक दिन पूर्वतयारीची आढावा उपजिल्हाधिकारी (सामान्प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला.
            यावेळी श्रीमती भोसले म्हणाल्या 26 जानेवारी, 2020 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमानिमित्त प्रत्येक विभागांनी त्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडण्याच्या सुचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
            बैठकीस तहसिलदार संतोष बनकर, नायब तहसिलदार श्रीमती मयुरा पेरे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.




No comments:

Post a Comment