Tuesday 7 January 2020


महारेशीम अभियानाचा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
            जालना, दि. 7 -  शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात रेशीम शेतीकडे वळावे या उद्देशाने दि. 7 ते 21 जानेवारी, 2020 दरम्यान महारेशीम अभियानाचे आयोजन करण्यात आले असुन या अभियानाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात प्रचार रथास हिरवी झेंडी दाखवुन करण्यात आला. 
            शेतकऱ्यांनी अधिकाधिक रेशीम शेती करुन आपल्या उत्पन्नात भर घालण्यासाठी व या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक 7 जानेवारी 2020 ते 21 जानेवरी 2020 या कालावधील mahareshim.com या संकेतस्थळावर नोंदणी करुन आवश्यक ती कागदपत्रे व अर्ज, नोंदणी शुल्क जिल्हा रेशीम कार्यालय,नवीन मोंढा, देउळगावराजारोड, जालना  येथे दिनांक 21 जानेवारी पुर्वी किंवा पर्यत जमा करावीत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
            यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी जी.एम. मिसाळ, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी अजय मोहिते यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment