Thursday 23 January 2020


पालकमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली
24 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक
            जालना दि.23- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक दिनांक 24 जानेवारी, 2020 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.  
            बैठकीची विषयसुची पुढील प्रमाणे राहील :- दिनांक 14 जुन 2019 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील इतिवृत्तास मान्यता देणे व अनुपालन अहवाल सादर करणे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/एस.सी.पी./.टी.एस.पी.) सन 2019-20 अंतर्गत माहे डिसेंबर 2019 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा. तसेच पुनर्विनियोजन प्रस्तावांना मान्यता देणे.  जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/एस.सी.पी./.टी.एस.पी.) सन 2020-21 च्या प्रारुप आराखडयास मान्यता देणे व पालकमंत्री महोदयांच्या परवानगीने आयत्या वेळी घेण्यात येणारे विषय असतील, असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, जालना यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment