Monday 11 July 2016

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

जालना- सन 2015-16 या शैक्षणिक वर्षात इयत्त 10 वी, व इयत्ता बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विशष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून (60 टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणारे अर्ज करण्यास पात्र राहतील.) उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनींना महामंडळाकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधिन राहून अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
            विद्यार्थी विद्यार्थीनींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादीत,डॉ. बाबासाहेब आंबेडक्रर, सामाजिक न्यायभवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना येथे दि. 15 जुलै 2016 पर्यंत दोन प्रतीत अर्ज सादर करावेत.अर्जासोबत अर्जदाराचा जातीचा दाखल सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा, अर्जदाराचा कुंटूंबाचा उत्पनाचा दाखला, तहसीलदार यांच्याकडुन घेतलेला असावा, रेशनकार्ड, आधारकार्ड झेराक्स प्रती, गुणपत्रक, दोन पासपोर्ट फोटो, आणि बोनाफाईड, पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती इत्यादी कागदपत्रे सोबत जोडावीत, असे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

***-***

No comments:

Post a Comment