Friday 9 August 2019

मिळेल त्या साधनाने..विविध मार्गाने प्रत्येकजण करतोय पूरग्रस्तांची मदत


            लष्करएनडीआरएफसडीआरएफनौदलजिल्हा प्रशासनलोकप्रतिनिधीसेवाभावी संस्थापत्रकारसामाजिक कार्यकर्तेस्थानिक नागरिक हे सगळेच मिळेल त्या साधनाने अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. कुणी तराफ्यावरूनदोरीच्या सहाय्यानेप्लास्टिक खुर्चीच्या मदतीने तर कुणी प्लास्टिक बॅरेलच्या सहाय्याने पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत.
            टाकवडे येथील आधार रेस्क्यू फोर्सने ग्रामस्थांच्या मदतीने शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील पूरग्रस्तांना तराफ्यावरून बाहेर काढले आहे. शिरोळ तालुक्यातील कुरूंदवाडबहिरेवाडी येथे एनडीआरएफ पूरग्रस्तांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढत आहेत. भुदरगड तालुक्यातील मडुरवासनोलीपाळ्याचा हुडाचोपडेवाडी येथील चार गरोदर महिलांना यांत्रिक बोटीचा वापर करून गारगोटी येथील ग्रामीण रूग्णालयात सुखरूप दाखल करण्यात आले.
            हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी येथील अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रेस्क्यू यंत्रणा  पार पाडावी लागली. मंडल अधिकारीतलाठीग्रामसेवक या महिला कर्मचाऱ्यांनी गावात थांबून दोरीच्या सहाय्याने पूरग्रस्तांची सुटका केली. एसटी परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकचे बॅरेल आणि बांबूपासून तराफा बनवून स्थानिक तरूणांच्या सहकार्याने पूरग्रस्तांची सुटका केली आहे. तर काही ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या प्लास्टिक खुर्चीच्या माध्यमातून वृध्दांना पाण्यातून बाहेर काढले आहे. आंबेवाडीमध्ये अडकलेल्या लोकांना चेअर नॉटच्या सहाय्याने दुसऱ्या मजल्यावरून आपत्ती व्यवस्थापकांनी रोप रेस्क्यू केला. शिरोळ तालुक्यातील राजापूर येथे नौदलाच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबविले आहे. या जवानांसाठी पालकमंत्र्यांनी 100 चादरी शिरोळ येथील शिबीरामध्ये दिले आहेत. शहरातील विविध ठिकाणी सेवाभावी संस्थांनी शिबीरांमध्ये पूरग्रस्तांसाठी भोजननिवास आदीची सोय केली आहे. त्यामध्ये  शिरोली मधील मदरसाही सहभागी झाला आहे.
            सोशल मीडियाव्हॉट्अॅपफेसबुकटेलिग्रामव्टिटर या समाज माध्यमांवरूनही विविध सेवाभावी संस्था आणि युवक मंडळांनीपत्रकारांनी मदतीबाबत आपला सहभाग नोंदवला आहे. विशेषत: चादरी,भोजन,पाणी,औषधे आदीची मदत देण्याबाबत विविध संपर्क क्रमांक याबाबतच्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष सहभागही नोंदवला आहे.
            आलेल्या या नैसर्गिक आपत्तीत सर्वच यंत्रणांनी जमेल त्या मार्गाने आपला सहभाग नोंदवला आहे. माणसांबरोबरच प्राण्यांनाही वाचविण्यात यश आल आहे. त्यामुळेच सध्या पूरपरिस्थिती नियंत्रणात आहे.


                                                                                                            -प्रशांत सातपुते
                                                                 -जिल्हा माहिती अधिकारी
                                                                      -कोल्हापूर

No comments:

Post a Comment