Thursday 17 May 2018

जालना महोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवा राज्य व देशपातळीवर नावलौकिक मिळवलेल्या जिल्ह्यातील कलावंतांचा गुणगौरव करणार -- पालकमंत्री बबनराव लोणीकर




        जालना, दि. 17 –  जालना शहरामध्ये 18 ते 22 मे दरम्यान जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा महोत्सव यशस्वीरित्या तसेच सुरळीतपणे पार पाडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महोत्सवादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलीस प्रशासनास दिले.     
            जालना महोत्सव 2018 च्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री   श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, घनश्याम गोयल, सुभाष देविदान, उमेश पंचारिया, विरेंद्र धोका,अकलंक मिश्रीकोटकर, भावेश पटेल, मनिष तावरावाला, सुनिल पाचमा, डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. नीता पंकज जैन, डॉ. संजय पुरी, राजेश शहा, प्राजक्ता पाटील, गोपाल गोयल, अर्जून गेही, सुरेश केसापुरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  जालना शहरात आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवामध्ये अनेक सिनेकलाकार तसेच राज्यातील महत्वाचे व्यक्ती कार्यक्रमास उपस्थित राहणार असुन कार्यक्रमास जिल्ह्यासह राज्यातून नागरिकांची उपस्थिती राहणार आहे.  त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणावापासून मुक्तता मिळावी व जिल्ह्यातील कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा हा या कार्यक्रमामागचा मुख्य हेतू आहे.  जालना महोत्सवामध्ये स्थानिक कलावंताना एक हक्काचे व्यासपीठ मिळणार असुन या माध्यमातुन त्यांना आपली कला सादर करता येणार आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातुन एक आपलेपणानाची भावना या कार्यक्रमातून समाजामध्ये दृढ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत हा महोत्सव यशस्वी होऊन जालना जिल्ह्याचं नाव देशपातळीवर जावा यासाठी पदाधिकारी, अधिकारी तसेच जिल्ह्यातील प्रत्येक समाजाच्या व्यक्तीने या महोत्सवात सहभाग नोंदविण्याचे आवाहन पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            जिल्ह्यातील अनेक कलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातुन जिल्ह्याचा देशपातळीवर नावलौकिक केला आहे.  देशपातळीवरील अनेक पुरस्कार या कलावंतांनी पटकावलेले आहेत.  अशा कलाकांराना त्यांची कला जिल्हा वासियांना या महोत्सवाच्या माध्यमातुन पहाता येणार आहे.  तसेच या कलाकारांचा गुणगौरवही या महोत्सवाच्या माध्यमातुन करण्यात येणार आहे. केवळ कलाकारच नाही तर प्रशासनामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांही या महोत्सवामध्ये सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगत शहरातील उद्योजकांच्या पुढकाराने हा महोत्सव होत असुन सुंदर अशा महोत्सवाच्या आयोजनाबद्दल त्यांनी महोत्सव आयोजन समितीचे अभिनंदही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, मागील अनेक वर्षाच्या नंतर जालना शहरामध्ये अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असुन जिल्हावासियांसाठी ही एक मेजवानी ठरणार आहे. महोत्सवादरम्यान स्वच्छतेची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाने चोखपणे पार पाडण्याबरोबरच अखंडित वीज पुरवठा राहण्यासाठी विद्युत विभागाने योग्य ती दक्षता घ्यावी.  तसेच महोत्सवाच्या ठिकाणी नागरिकांना सहजपणे पोहोचता यावे यासाठी एस.टी. महामंडळाने बसेसची सोय करण्याची सुचनाही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी केली.
            जालना महोत्सव 2018 यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची ग्वाही देत महोत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने दक्षता घेण्याचे निर्देश देऊन या महोत्सवात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहनही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी केले.
            यावेळी विरेंद धोका यांनी 18 ते 22 मे दरम्यान घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.  बैठकीस जालना महोत्सव 2018 समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment