Friday 11 May 2018

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा, 3400 कोटींची मदत जाहीर: जालना जिल्ह्यासाठी २६३ कोटी मंजूर - पालकमंत्री बबनराव लोणीकर







                जालना दि.11- जालना  जिल्ह्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने हजारो हेक्टरमधील कपाशी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते  बोंड अळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. खरीप हंगामात बोंडअळी आणि तुडतुडे रोग प्रभावीत पिकांच्या शेतक-यांना  राज्य शासनाने  मदत देण्याबाबातचा शासन निर्णय जारी  केला असून  यानुसार ३ हजार ४८४ कोटी रुपये रक्कम शेतक-यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. 3 समान हप्त्यात ही मदत शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे जालना जिल्ह्यासाठी २६३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून यापैकी रु ७३.४३ लक्ष निधी प्राप्त झाला असून निधी वाटपाचे आदेश काढण्यात आले आहे व उर्वरित रक्कम  लवकरच  शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार असल्याची  माहिती  पालकमंत्री  बबनराव लोणीकर यांनी दिली 
जिल्ह्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर महाराष्ट्रात  सर्वप्रथम पालकमंत्री श्री लोणीकर यांनी  नोव्हेंबर २०१७  मध्ये  जांबसमर्थ ता. घनसावंगी, आष्टी ता. परतूर आणि पिंपरखेडा ता. मंठा येथे शेतात प्रत्यक्ष जाऊन या नुकसानीची पाहणी केली होती. एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही,  प्रत्येक शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याचे आदेश शासकीय यंत्रणेला दिले  बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसानी संदर्भात जिल्ह्यात सुरु असलेलया पंचनाम्याबाबतचा सविस्तर आढावा पालकमंत्री श्री लोणीकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडून वेळोवेळी घेऊन पाठपुरावा केला  विभागीय आयुक्तांना नुकसान भरपाईसाठी मागणी प्रस्ताव  शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले 
जालना जिल्ह्यात ३७२४१४  हेक्टर क्षेत्रावतील ५२८८७३ शेतकऱ्यांचे  कपाशी पिकांचे कमी अधिक प्रमाणात अतोनात नुकसान झाले होते  यासंदर्भात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी नोव्हेंबर 2017 मध्येच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या नुकसानीसंदर्भात माहिती दिली होती. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे तात्काळ नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत द्यावी अशी मागणी पालकमंत्री श्री. लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती तसेच मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा याविषयी वेळोवेळी पुढाकार घेतला जालन्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यातून या नुकसानीच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात तातडीने दखल घेवून राज्यात सर्वत्र नुकसानीचे पंचनामे  करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यासाठी अनुदान मागणी तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे.
जालना -३५.११ कोटी , बदनापूर-२६.३० कोटी ,भोकरदन- ४६.४५ कोटी ,जाफ्राबाद -२६.९५ कोटी ,परतूर- २९.१० कोटी, मंठा -१४.३१ कोटी, अंबड- ४७.३१ कोटी, घनसावनगी -३८.१२ कोटी
-*-*-*-*-*-*


No comments:

Post a Comment