Thursday 3 October 2019


मतदार जनजागृती  चित्ररथास  जिल्हाधिकाऱ्यांनी  दाखविली  हिरवी  झेंडी
जालना, दि. 3 :- भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणात जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजवावा, यासाठी प्रशासनाच्यावतीने मतदार जनजागृती चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथास आज जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी हिरवी झेंडी दाखवून मतदार जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ केला. तर  उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली  मोतियळे  यांच्या  हस्ते  फीत कापण्यात आली. स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती करण्यासाठी हा चित्ररथ  विविध भागात मतदार जनजागृती करेल. याव्दारे मतदारांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. जिल्हयातील  5 विधानसभा मतदारसंघात एकुण 15 लाख 21 हजार 324 मतदार आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत ही स्वीप अंतर्गत मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात असून मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत सक्रीय सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्न केला जात आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे. तर गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे.. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदानाचा हक्क बजावून आपलं कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांनी यावेळी केले.
हा चित्ररथ जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातून फिरविण्यात येणार असुन                     101- जालना विधानसभा मतदारसंघात  3 ते 7 ऑक्टोबर 2019, 99-परतूर मध्ये 8 ते 10 ऑक्टोबर,               100-घनसावंगीमध्ये 11 ते 13 ऑक्टोबर, 103-भोकरदनमध्ये 14 ते 16 ऑक्टोबर तर 102- बदनापुर विधानसभा मतदारसंघामध्ये 17 ते 19 ऑक्टोबर , 2019 दरम्यान चित्ररथाच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात येणारन आहे.
यावेळी प्र. जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, नायब तहसिलदार गणेश पोलास, शरद आडणे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.




No comments:

Post a Comment