Tuesday 1 October 2019

पदवीधर मतदार संघाची अधिसुचना प्रसिद्ध अर्हताधारक व पात्र पदवीधरांनी मतदार म्हणुन नोंदणी करावी



            जालना दि.1-  5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातील मतदार यादी नव्याने तयार करण्यात येणार आहे.  यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम घोषित केला असुन त्याची अधिसुचना 1 ऑक्टोबर, 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, चारही उप विभागीय कार्यालय, तहसिल कार्यालये पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायत्या येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार नोंदणीसाठी आवश्यक असलेले कोरे फॉर्म तहसिल कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयात उपलब्ध असुन अधिकाधिक अर्हताधारक व पात्र पदवीधरांनी मतदार म्हणुन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
            मतदार नोंदणीसाठी  भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर, 2019 हा अर्हता दिनांक निश्चित केला असुन नवीन पात्र मतदारांचे नमुना 18 मधील अर्ज स्वीकारण्यासाठी सर्व तालुक्यांच्या महसुल मंडळातील मंडळ अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आलेले असुन सर्व उप विभागीय अधिकारी हे त्यांच्याशी संबंधित निर्वाचन क्षेत्रासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. मतदारांना या संदर्भात कोणतीही मदत हवी असल्यास सर्व तहसिल कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळुन सुरु असलेल्या मतदार मदत केंद्रात नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे कालावधी पुढील प्रमाणे
            मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये  जाहीर सुचना प्रसिध्द करण्याचा दिनांक :                 1 ऑक्टोबर 2019 वार मंगळवार, मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये  वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी : दि. 15 ऑक्टोबर 2019 (मंगळवार), मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्वप्रसिध्दी : दि.25 ऑक्टोबर 2019 (शुक्रवार), नमुना 18 किंवा 19 द्वारे दावे व हरकती स्विकारण्याचा अंतिम दिनांक 6 नोव्हेंबर 2019 (बुधवार), हस्तलिखित तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई : दि.19 नोव्हेंबर 2019 मंगळवार, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी : दि.23 नोव्हेंबर 2019 (शनिवार), दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी : दि.23 नोव्हेंबर (शनिवार) ते दि.9 डिसेंबर 2019 (सोमवार), दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे : दि.26 डिसेंबर 2019 (गुरुवार) व मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी : दि.30 डिसेंबर 2019 (सोमवार).
-*-*-*-*-*





No comments:

Post a Comment