Saturday 1 July 2017

पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण

1 ते 7 जुलै वृक्ष लागवड सप्ताह तसेच वनमहोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.  सिरसवाडी येथील वनविभागाच्या जागेत पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  वन विभागामार्फत या ठिकाणी 1 हजार 200 वृक्षांचे तसेच संपूर्ण जिल्ह्यात 75 हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.  या वृक्षारोपण कार्यक्रमात सेंट जॉन्स हायस्कुल व रेऑन इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.  यावेळी सहाय्यक वनसंरक्षक श्री शिंदे यांनी वृक्षारोपणासंदर्भातील माहिती पालकमंत्री महोदयांना दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते वृक्षाचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या प्रांगणात वृक्षारोपण
 जालना येथे असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या प्रांगणात पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते वृक्षाचे रोपण करण्यात आले.  याप्रसंगी कार्यकारी अभियंता ए.जे. सिंह यांनी मंत्री महोदयांना वृक्षारोपणाची विस्तृत अशी माहिती दिली.
राज्य राखीव पोलीस दल तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात वृक्षारोपण
जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रांगणात पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षाचे रोपण करण्यात आले.  यावेळी समादेशक भारत तांगडे म्हणाले की, राज्य राखीव पोलीस दलाच्या निवासव्यवस्थेचा तसेच दलाचा बळकटीकरणासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे 192 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पालकमंत्री श्री लोणीकर यांनी जवानांप्रती आत्मियता दर्शवून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचे आभारही समादेशकांनी यावेळी व्यक्त केले.


जिल्हा परिषद प्रांगणात पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण

येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पालकमंत्री बबनराव लोणीकर  यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी आमदार राजेश टोपे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीष टोपे, माजी आमदार अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, सभापती दत्ता बनसोडे, सभापती श्रीमती जिजाबाई कळंबे, जि.प. सदस्य श्री जाधव, सदाशिव शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धोत्रे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे आदींची उपस्थिती होती. 


No comments:

Post a Comment