Wednesday 28 December 2016

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्यासाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना, दि. 28 – शेतकऱ्यांसह सर्वसामान्य व्यक्तीच्या विकासासाठी शासन सातत्याने प्रयत्नशिल संपूर्ण जिल्ह्यात दर्जेदार रस्ते, मुबलक प्रमाणात पाणी, वीज व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            शेलगांव-अंगलगांव (75 लक्ष), ग्रा.पं.कार्यालय (12 लक्ष), सिमेंट रोड (6 लक्ष ), लिंगसा-लिखीत पिंप्री (30 लक्ष), लिंगसा जलयुक्त शिवार (32 लक्ष), सभामंडप (07 लक्ष), सिमेंट  रस्ता (3 लक्ष), लिखीत पिंप्री सभामंडप (7 लक्ष) आष्टी रोड ते हास्तुर तांडा (30 लक्ष), आष्टी ते पळशी आनंदगाव (20 लक्ष), लिखीत पिंप्री सौरपंप (05 लक्ष), हास्तुर तांडा सिमेंट रस्ता (3 लक्ष ) या रस्त्याच्या डांबरीकरणासह ब्राम्हणवाडी येथे जलयुक्त शिवार अंतर्गत सिमेंट नाला बांध (22)लक्ष, आमदार फंड अंतर्गत सामाजिक सभागृह (7 लक्ष), लिंगसा ता. परतूर येथे आमदार फंड अंतर्गत सामाजिक सभागृह (7)  व 25/15 निधी अंतर्गत रस्ता (3 लक्ष) इत्यादी  कामांच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री बबनराव लोणीकर बोलत होते.
            यावेळी राहुल लोणीकर, गोपाळ बोराडे, मदनलाल शिंगी, पांडूआबा सोळंके, माणीकराव वाघमारे, शहाजी राक्षे, रामप्रसाद थोरात, दिलीप थोरात, अमोल जोशी, सिध्दू सोळंके, सुदाम प्रधान, विनायक लहाने, गजानन लिपणे, दिनकर लिपणे, बालासाहेब कोरडे, अशोक सोळंके, अच्चुत पवार, भास्कर सोळंके, भरत देशमुख, हरीभाउ चौधरी, बाबाराव थोरात, राजू मालधन, विष्णू सोळंके, बाळासाहेब सोळंके, रमेश राठोड, माउली चौरे, सुभानभाई जमीनदार, शिवदास आढे, सखाराम खांडेभराड, नारायण कदम, बाळासाहेब पोटे, मोराती जाधव, शिवहरी पोटे, नितीश चव्हाण, उपविभागीय अधिकारी ब्रिजेंश पाटील, गट विकास अधिकारी आर.एल. तांगडे, तालुका कृषी अधिकारी एल.जी.कांबळे, कार्यकारी अभियंता व्हि.एम.डोगळीकर, उप अभियंता एल.डी.देवकर, आर.टी बोनगे, श्री. डाखोरे, श्री. पाटील आदींची उपस्थिती होती.
            यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  शासन दर्जेदार रस्त्यांसाठी सातत्याने प्रयत्नशिल असून जिल्ह्यासह मतदारसंघातील एकही गाव डांबरी  व पक्क्या रस्त्यापासून वंचित राहणार नाही.  राज्यासह जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेती व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यात शासन यशस्वी झाले असून येणाऱ्या काळात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून अधिक गतीने कामे करुन पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब न् थेंब अडविण्यात येणारअसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्यातील विद्युत विकासावर भर देण्यात येत असून जिल्ह्यात नवीन 33 के.व्ही., 132 के.व्ही., 220 के.व्ही ची स्टेशनबरोबरच नवीन 1 हजार 500 नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात येणार असून यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील जनता व शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीज पुरवठा होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            दीड वर्षामध्ये पर्यावरण मंत्रालयासह इतर सर्व आवश्यक अशा परवानग्या मिळविण्यात येऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे जलपुजन वभूमिपुजन करण्यात आले असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन सातत्याने सकारात्मक निर्णय घेत असून दुष्काळी परिस्थितीमध्ये नापिकीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पीकाची नुकसान भरपाई, दुष्काळी अनुदान, पीकविमा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून येणाऱ्या काळातही शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

***-***


No comments:

Post a Comment