जालना,
दि. 22 – धुळे जिल्हा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मु.पो. हातोडी ता
घनसावंगी जि. जालना येथील बंदी रमेश आसाराम नाथभजन हा 4 जुलै, 2011 रोजी संचित व
अभिवचन रजेवर होता. दि. 30 डिसेंबर, 2011
रोजी सदरील बंदी कारागृहात स्वत:हून हजर होणे आवश्यक होते. परंतू सदरील बंदी 30 डिसेंबर, 2011 पासून फरार
झालेला आहे. या बंदयाविरुद्ध कलम 224 भा.द.वि. नुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा
नोंद करण्यात आला असल्याचे अधीक्षक, जिल्हा कारागृह वर्ग-1, धुळे यांनी
पत्रकाद्वारे कळविले आहे.
***-***
No comments:
Post a Comment