Thursday 22 December 2016

ग्रामीण भागाच्या विकासासाठी राज्य शासन प्रयत्नशिल – पालकमंत्री बबनराव लोणीकर



जालना, दि. 22 –  ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या रस्ते, पाणी, वीज यासारख्या बाबी प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी  राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            पांगरी गोसावी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन तसेच पांगरी गोसावी- नांगरतास-गोरखुश्वर मंदिर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, दलित वस्तीमधील सिमेंट रस्ता तसेच जिल्हा परिषद शाळेच्या बांधकाम अशा एकूण एक कोटी 5 लक्ष रुपयांच्या कामाचे उदघाटन पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर शहाजी राक्षे, हरिराम माने, भाऊसाहेब कदम, विठ्ठलगिरी महाराज, मदनलाल शिंगे, बी.डी. पवार, गणेशराव खवणे, सुनिल कुलकर्णी,  राजेश मोरे, दारासिंग चव्हाण, दत्ताराव चव्हाण, अशोक वायाळ, अशोकअप्पा सोनटक्के, महादेव बाहेकर, सोपानराव खारवणे, विठ्ठलराव काळे, श्रीराम जाधव, अमरसिंह राठोड, पंजाब पुणेकर, राजेभाऊ बोंगाडे, श्रीराम राठोड, भास्कर राठोड, गोविंद गेमाराठोड, शिवाजी नाना,  सरपंच महेश पवार,  उपसरपंच दिगांबर चव्हाण, भिमराव जाधव, सुधाकर चव्हाण, रावसाहेब राठोड, वैजनाथ टेकाळे, महेश पवार, राम चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, रामेश्वर चव्हाण, कल्याण चव्हाण, नवनाथ देशमुख, तहसीलदार श्री गायकवाड, कार्यकारी अभियंता श्री डाकोरे, उपअभियंता श्री चव्हाण आदींची उपस्थिती होती.
            भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, देशात महाराष्ट्र राज्य स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.  राज्यातील 45 तालुके व  1 हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.  देशातील 10 जिल्हे हे ओडीएफ झाले असून त्यापैकी पाच जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत.  राज्यातील प्रत्येक नागरिकाला शौचालय उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनामार्फत 12 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत असून प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा.   परतूर तालुका येत्या 1 जानेवारीपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा आपण संकल्प केला असून संपूर्ण जालना जिल्हाही येत्या काळात हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन सातत्याने सकारात्मक निर्णय घेत असून दुष्काळी परिस्थितीमध्ये नापिकीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पीकाची नुकसान भरपाई, दुष्काळी अनुदान, पीकविमा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून येणाऱ्या काळातही शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकासात महत्वाचा भूमिका बजावणाऱ्या रस्ते विकासाला शासनाने प्राधान्य दिले असून या रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.   येणाऱ्या काळात जिल्ह्यातील एकही गाव पक्क्या  व डांबरी रस्त्यापासून वंचित राहणार नसल्याची ग्वाहीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिली.
            शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याबरोबरच वीज मिळण्याबरोबरच वीजेचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघावा यासाठी 220 के.व्ही.चे 3 संच  33 के.व्ही. चे 39 तर  व 132 के.व्ही. चे एक विद्युत केंद्राबरोबरच  जिल्ह्यात नवीन 1 हजार 500 ट्रान्सफार्मर आणि 12 हजार 900 शेतीपंपाना वीजजोडणीचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            मुंबईजवळच्या अरबी समुद्रात भव्यदिव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या जलपूजन व भूमिपूजन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये       दि. 24 डिसेंबर, 2016 रोजी होत आहे.  या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील नद्यांचे पवित्र जल व तीर्थक्षेत्रांची माती घेऊन जाणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहनही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी केले.
            दरम्यान पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते 30 लक्ष रुपये किमतीच्या बाबई ते चितळीपुतळी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, 27 लक्ष रुपये किंमतीच्या दहिफळ भोगाने रस्ता मजबुतीकरण व ग्रामपंचायत कार्यालय, 20 लक्ष रुपये किंमतीच्या वाघाडी येथील रस्ता डांबरीकरण, 45 लक्ष रुपये किंमतीच्या जयपुर-नायगाव-खोराडसांगवी ते प्रजिमा 13-रस्ता-प्रजिमा 26 रस्त्याची सुधारणा, 45 लक्ष रुपये किंमतीच्या जयपुर-नायगाव-खोराडसांगवी रस्त्याची सुधारणा करणे, 20 लक्ष रुपये किंमतीच्या प्रजिमा-13 ते पेवा ईजीमा 127 रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, 25 लक्ष रुपये किंमतीच्या सिमेंट बंधारा व नळडोह ते किर्तापुर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामांचा शुभारंभही करण्यात आला.
***-***





No comments:

Post a Comment