Saturday 17 September 2016

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहिदांना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत मानवंदना

जालना, दि. 16 –  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली तर पोलीस जवानांनी हवेत तीन फेरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. जिल्हयात आज सर्वत्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
            शहरातील टाऊन हॉल जवळच्या मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृती स्तंभास आज मुख्य शासकीय ध्वजवंदना आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेशही दिला.
            याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक श्रिन्नया शिवलिंगु बैभारी, श्रीमती मंगलाबाई लक्ष्मीनारायण गिंदोडिया, श्रीमती कांताबाई विश्वंभरराव मिटकर, श्रीमती राणीरंभा अजीजखॉ, श्रीमती चांदबाई कटारिया, श्रीमती प्रभावती जोशी, रामेश्वर लादूराम दायमा यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येऊन मान्यवरांनी स्वातंत्र्य सैनिकांसह उपस्थित नागरिकांना मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांनी लोकमान्य टिळक यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपनगराध्यक्ष शहा आलम खान, रामेश्वर भांदरगे, एकबाल पाशा, विलास नाईक, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेश जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र जगताप, सहाय्यक आयुक्त सामाजकल्याण श्री शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***-***



No comments:

Post a Comment