Thursday 16 September 2021

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

 



            जालना, दि.17 (जिमाका) :-  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

            यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,  उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) ज्ञानोबा बानापुरे, उपजिल्हाधिकारी श्रीमती अंजली कानडे, जिल्हापुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्यै, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी उपस्थित होते.

*******

No comments:

Post a Comment