जालना : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०३ पदवीधर व ०२ शिक्षक
मतदारसंघातील रिक्त होणाऱ्या जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर
केला आहे. या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, म्हणजेच ६ डिसेंबर २०२६ पर्यंत
निवडणूक आचारसंहिता लागू राहणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या
पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीत जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्याबाबत जालना
जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत दर महिन्याच्या
पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार
नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जालना यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment