Wednesday, 16 September 2026

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी जालना जिल्ह्यात मंगळवारी ३३ अर्ज प्राप्त;आतापर्यंत २३७ अर्ज प्राप्त


जालना, दि. १६ (जिमाका) : कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी जिल्ह्यात दि. १५ सप्टेंबर रोजी आयोजित १३ शिबिरांमध्ये एकूण ३३ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २३७ एवढे अर्ज प्राप्त झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी जालना जिल्ह्यात दि. १० ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मंडळस्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात जालना व बदनापूर तालुक्यांत चार, अंबड व घनसावंगी तालुक्यांत तीन, भोकरदन व जाफराबाद तालुक्यांत तीन तसेच परतूर व मंठा तालुक्यांत तीन, अशी एकूण १३ शिबिरे आयोजित करण्यात आली. जालना तालुक्यात तीन शिबिरात १९ अर्ज, भोकरदन तालुक्यात दोन शिबिरांत तीन अर्ज, जाफराबाद तालुक्यात एका शिबिरात पाच अर्ज, तर परतूर तालुक्यात दोन शिबिरांत सहा अर्ज प्राप्त झाले. बदनापूर, अंबड, घनसावंगी आणि मंठा तालुक्यात आयोजित शिबिरांमध्ये एकही अर्ज प्राप्त झाला नाही. मंगळवारी प्राप्त सर्व ३३ अर्ज समिती प्रवर्गातील असून गॅझेट प्रवर्गात एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. या अर्जांवर तालुकास्तरीय वंशावळ समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

 

****

No comments:

Post a Comment