जालना,दि.18(जिमाका)
: भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केंद्रीय संचार
ब्यूरो, जिल्हा प्रशासन, जालना व ग्रामपंचायत रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना
यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 17 सप्टेंबर रोजी
ग्रामपंचायत रोहिलागड प्रांगण, तालुका- अंबड, जिल्हा-जालना येथे करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमात मंचावर जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास संस्थाचे प्रकल्प संचालक, सुनीलकुमार पठारे, अंबड
पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी, ज्योती कवडदेवी, शासकीय ज्ञान विज्ञान
महाविद्यालयाचे प्राध्यापक, वसंत संसारे, केंद्रीय संचार ब्यूरोचे
प्रबंधक, संतोष देशमुख, सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, शंकर मोरे,
विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासक, ए. ए. चव्हाण, ग्रामविकास अधिकारी, एस.
डी. चव्हाण, जांबुवंत माध्यमिक विद्यालायाचे मुख्याध्यापक, संजय नलावडे, शिक्षक,
दिपक सोनवणे, जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापिका, सविता राजरवार,
शिक्षक, नामदेव गंगावणे व कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन्ही शाळांचे शिक्षक व
कर्मचारी, ग्रामपंचायतीचे माजी अधिकारी व पदादिकारी, कर्मचारी, प्रतिठित नागरिक,
ग्रामस्थ व दोन्ही शाळांचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी मराठवाडा मुक्तीसंग्राम
दिनानिमित्त मार्गदर्शन, प्रभात फेरी, ध्वजारोहण, चित्रकला, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, इको फ्रेंडली गणपती मूर्ती बनवणे स्पर्धा, बक्षिस वितरण, पथनाट्य (सांस्कृतिक कार्यक्रम) आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सुनीलकुमार पठारे व वसंत संसारे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव गंगावणे यांनी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी व आभार प्रदर्शन प्रदीप पवार यांनी केले. कार्यक्रमात केंद्र शासनाचे
पंजीकृत, आभा कला मंच, छत्रपती संभाजीनगर यांच्या पथनाट्य - सांस्कृतिक
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद केंद्रीय शाळा व जांबुवंत
माध्यमिक विद्यालय येथून विद्यार्थ्यांद्वारा तिरंगा झेंडा व जनजागृतीपर पाट्या घेऊन प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रभात फेरीत हातातील पाट्यांद्वारे
विद्यार्थ्यांनी स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आदी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रित भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा घेतली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्त आयोजित जिल्हा परिषद
केंद्रीय शाळेत आयोजित चित्रकला स्पर्धेत अक्षरा टकले, अलविरा शेख, साक्षी पाटील,
निबंध स्पर्धेत आदित्य कदम, सौरभ चंदनशिव, वकृत्व स्पर्धेत शीतल वैद्य, जोया तांबोली,
साक्षी पाटील, इको फ्रेंडली गणपती मूर्ति बनवणे स्पर्धेत वेदांत पाटील, साईं
तेलोरे व रांगोली स्पर्धेत ज्ञानेश्वरी टकले, अमृता टकले आणि जांबुवंत माध्यमिक
विद्यालयात आयोजित चित्रकला स्पर्धेत कार्तिक बमनाथ, आर्यन काकरवाल, स्वरुपा
पाटील, निदा शेख, सोनल काकरवाल व दिक्षा मगरे यांना पारितोषिक देऊन गौरवन्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता केंद्रीय संचार
ब्यूरो, छत्रपती संभाजीनगरचे प्रदीप पवार, प्रिती पवार, मालु वाडेकर, शंकर मोरे, शरद सादिगले,
ग्रामपंचायतीचे माजी अधिकारी व पदाधिकारी, कर्मचारी व जिल्हा परिषद केंद्रीय शाळा व जांबुवंत
माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
****
No comments:
Post a Comment