प्रलंबित महसूल प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याचे निर्देश
जालना,दि.7(जिमाका): महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने
निपटारा करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जालना जिल्ह्यात ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान दि. 1 सप्टेंबर
2026 ते दि. 31 मार्च 2027 या कालावधीत राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने
दिले आहेत.
या
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,
नायब तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयातील प्रलंबित महसूल
प्रकरणांचा आढावा घेऊन त्यांचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अभियानांतर्गत मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी
स्तरावर विशेष लोक अदालत घेण्यात येणार आहेत. पहिल्या फेरीत मंडळ अधिकारी
स्तरावर दि.
2 सप्टेंबर, 2026 रोजी तर तहसीलदार
स्तरावर दि. 9 सप्टेंबर 2026, उपविभागीय अधिकारी स्तरावर
दि. 16 सप्टेंबर 2026, अपर जिल्हाधिकारी स्तरावर दि. 23 सप्टेंबर आणि जिल्हाधिकारी स्तरावर दि. 30 सप्टेंबर 2026
रोजी लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. दुसऱ्या फेरीत अनुक्रमे दि. 2, 9, 16,
23 आणि दि. 30 डिसेंबर, 2026 रोजी या लोक अदालतांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली काढून नागरिकांना अनावश्यक विलंब होणार
नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहे.
****
No comments:
Post a Comment