Wednesday, 9 September 2026

धान्याच्या काळाबाजाराविरोधात संयुक्त कारवाई; 157 क्विंटल धान्य जप्त

 

धान्याच्या काळाबाजाराविरोधात संयुक्त कारवाई; 157 क्विंटल धान्य जप्त

 

जालना, दि.9(जिमाका) : जिल्ह्यात धान्याचा काळाबाजार व अवैध साठवणुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने जालना तालुक्यातील चंदनझिरा येथे छापा टाकून 157.40 क्विंटल धान्य जप्त केले. या कारवाईत अनधिकृतरीत्या साठवून ठेवलेला तांदूळ, ज्वारी व वाटाणा आढळून आला.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि जिल्हा पुरवठा अधिकारी शशिकांत हदगल यांच्या निर्देशानुसार धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोपनीय माहितीच्या आधारे चंदनझिरा येथे ही कारवाई करण्यात आली.

सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर दिवटे, नायब तहसीलदार एस. आर. तायडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी महेश थेरे, सहायक महसूल अधिकारी देवानंद डोईफोडे तसेच पोलीस कर्मचारी व्ही. एस. बहुरे, पुंगळे आणि ए. बी. चव्हाण यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

तपासणीदरम्यान संबंधित ठिकाणी धान्याची साठवणूक, खरेदी-विक्री आणि वाहतुकीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे आढळून आले. तसेच साठा नोंदवही, विक्री नोंदी आणि इतर आवश्यक अभिलेखही आढळले नाहीत. पथकाने पंचनामा करून 157.40 क्विंटल धान्य जप्त केले असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

या प्रकरणी संबंधितांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

****

 

No comments:

Post a Comment