गोलापांगरी येथे 25 ब्रास बेकायदेशीर वाळू साठा जप्त
जालना,दि.9 (जिमाका): जालना
जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी जालना व
पोलीस अधिक्षक जालना यांच्या समन्वयाने महसूल व पोलीस प्रशासनाने अवैध वाळू उत्खनन
व वाहतुकीस आळा घालण्यासाठी विशेष धडक मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत
जिल्हाधिकारी जालना व पोलीस अधिक्षक जालना यांचे मार्गदशनाखाली राजू निहाळ नायब
तहसिलदार व इतर कर्मचारी तसेच पोलीस निरिक्षक श्री. खामगळ, यांच्या संयुक्त पथकाने
दि. 8 सप्टेंबर 2026 रोजी रात्रीच्या सुमारास गोलापांगरी परिसरात अचानक पाहणी व
तपासणी मोहीम राबवली. या तपासणीदरम्यान मौजे गोलापांगरी येथे अंदाजे 25 ब्रासचा
मोठा अवैध वाळू साठा आढळून आला. महसूल पथकाने तांतडीने कारवाई करत हा संपूर्ण वाळू
साठा जप्त केला आहे. जप्त केलेला वाळू साठा पुढील योग्य व्यवस्थेसाठी आणि
संरक्षणासाठी संबंधित सजाच्या तलाठ्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
अवैध वाळू साठा करणाऱ्या व
उत्खननात सहभागी असलेल्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महसूल विभागाकडून
सुरू आहे. जिल्ह्यात यापुढेही अशा प्रकारे बेकायदेशीर वाळू उत्खनन किंवा वाहतूक
आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment