जालना दि. 8 (जिमाका) :- NTA UGC NET जुन 2026 परीक्षा दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यातील इंस्टीट्युट ऑफ फार्मसी पाथ्रीकर कॅम्पस बदनापुर या परीक्षा उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे.
वरील परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होऊन परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असलयाने उपरोक्त नमुद परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागु करण्यात येत आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी जालना याद्वारे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकान्वये Institute of Pharmacy Pathrikar Campus, Badnapur या परीक्षा उपकेंद्राचे 200 मीटर परिसरात परीक्षेचे दिवशी आदेशात नमुद कालावधीकरीता सर्व सार्वजनिक टेलिफोन/एसटीडी बुथ फॅक्स/झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके बंद ठेवणेकरीता याद्वारे प्रतिबंधात्मक आदेश लागु करीत आहे. सदर आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस देण्यास पुरेसा कालावधी नसल्याने व परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार सदर आदेश एकतर्फी काढण्यात येत आहे. सदर आदेशाची प्रसिध्दी पोलीस अधिक्षक, जालना यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे करावी.
हा आदेश दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजीचे सकाळी 7.00 वाजेपासून सायंकाळी 7.00 वा. पर्यंत अंमलात राहील.
No comments:
Post a Comment