Monday, 7 September 2026

3 ऑक्टोबरला अभिजात मराठी भाषा दिवस

 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह

 

जालना,दि.7(जिमाका): मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिचे संशोधन, संवर्धन आणि व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी  9 ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा दिवस’, तर दि. 3 ते दि. 9 ऑक्टोबर या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे.

याबाबत मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी शासन परिपत्रकद्वारे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने जालना जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय तसेच अन्य संस्थांनी अभिजात मराठी भाषा दिवस व सप्ताह उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

या उपक्रमांतर्गत सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील राज्यातील कार्यालये, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, खाजगी उद्योग व आस्थापना, व्यापारी बँका तसेच शैक्षणिक संस्था, विद्यापीठे व महाविद्यालये यांचा सहभाग अपेक्षित आहे.

अभिजात मराठी भाषेच्या प्राचीन साहित्याचा अभ्यास, संशोधन, संवर्धन आणि प्रसाराला चालना देतानाच मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेबाबत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. विविध संस्था व आस्थापनांनी सप्ताहाच्या कालावधीत अभिजात मराठी भाषेशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन करून जास्तीत जास्त लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

****

No comments:

Post a Comment