Wednesday, 9 September 2026

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन


जालना,दि.9(जिमाका):  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महारागणेशोत्सव अंतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्‍हा  प्रशासनाच्‍या  वतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणपूरक व जनजागृतीपर उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत तालुकास्तरावरूनही पारितोषिक मिळविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी नोंदणीकृत अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वीकारण्यात येणार असून, स्पर्धेची सविस्तर माहिती व अर्जासाठी

https://ganeshotsav.pldmka.co.in/

या संकेतस्थळाचा वापर करावा.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : ११ सप्टेंबर, २०२६

स्पर्धेतील पारितोषिके पुढीलप्रमाणे आहेत :

* आंतरराष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके : प्रथम ₹७.५ लाख, द्वितीय ₹५ लाख, तृतीय ₹२.५ लाख.

* राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके : प्रथम ₹७.५ लाख, द्वितीय ₹५ लाख, तृतीय ₹२.५ लाख.

* राज्यस्तरीय पारितोषिके : प्रथम ₹७.५ लाख, द्वितीय ₹५ लाख, तृतीय ₹२.५ लाख.

* जिल्हास्तरीय पारितोषिके : प्रथम ₹५० हजार, द्वितीय ₹४० हजार, तृतीय ₹३० हजार.

* तालुकास्तरीय विजेत्या मंडळांना प्रत्येकी ₹२५ हजार व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या गणेशोत्सवातील सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणपूरक तसेच जनजागृतीपर उपक्रमांना व्यापक व्यासपीठ मिळवून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

 

****

No comments:

Post a Comment