जालना,दि.22 (जिमाका) : “मुलींनी केवळ मोठी स्वप्ने पाहू नयेत, तर ती स्वप्ने
पूर्ण करण्यासाठी त्यांना योग्य संधी आणि व्यासपीठही मिळाले पाहिजे” या दृष्टिकोनातून जालना जिल्ह्यातील होतकरू मुलींसाठी विमान वाहतूक
क्षेत्रातील करिअरची नवी दारे खुली करण्याचा पुढाकार जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल
(भा.प्र.से.) यांनी घेतला आहे. श्रीमती मित्तल या सध्या जालना जिल्हाधिकारी तथा जिल्हा
दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
जिल्हा
प्रशासनाच्या सहकार्याने IndiGoReach यांच्या “Giving
Wings to Fly – Shaping the Future of Indian Women in Aviation” या उपक्रमाअंतर्गत जालन्यातील पात्र युवतींना Commercial Pilot म्हणून
करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात
आला आहे.
24
सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील
DPC Hall येथे हा कार्यक्रम होणार आहे. 18 ते 35 वयोगटातील भारतीय महिला उमेदवारांसाठी
ही संधी असून, 10+2 मध्ये इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांत प्रत्येकी किमान
51 टक्के गुण तसेच लागू EWS उत्पन्न निकष आवश्यक आहेत. निवड झालेल्या पात्र उमेदवारांना
Commercial Pilot Licence (CPL) आणि ATR Type Rating Training, प्रशिक्षणादरम्यान निवास
व भोजनासाठी 100 टक्के सहाय्य, वैद्यकीय विमा तसेच पायलट मेंटॉरशिप आणि करिअर मार्गदर्शनाचा
समावेश असल्याचे कार्यक्रमाच्या माहितीत नमूद आहे.
या
उपक्रमामागील व्यापक उद्देश म्हणजे जालना जिल्ह्यातील मुलींना पारंपरिक करिअरच्या पलीकडे
पाहण्याची प्रेरणा देणे आणि विमान वाहतूक क्षेत्रासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात त्यांचा
सहभाग वाढविण्यासाठी संधीची दारे खुली करणे.
“आपल्या मुलींनी विमानात केवळ प्रवासी म्हणूनच नव्हे,
तर त्या विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलट म्हणूनही बसावे. आर्थिक किंवा सामाजिक परिस्थिती
त्यांच्या स्वप्नांच्या आड येऊ नये. जालन्यातील मुलींनी आत्मविश्वासाने आकाशाला गवसणी
घालावी, हीच या उपक्रमामागची भावना आहे.”
जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल
‘बेटी
बचाओ, बेटी पढाओ’पासून आता ‘बेटी को पायलट बनाओ’कडे एक नवे पाऊल — जालन्याच्या मुलींच्या
स्वप्नांना आता खऱ्या अर्थाने पंख मिळणार आहेत! जालन्याची लेक… आता आकाश तिचे! ✈️
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment