जालना,दि.16(जिमाका) : जिल्ह्यात पंतप्रधान विश्वकर्मा योजना राबविण्यासाठी 17 सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात एकाच दिवशी व एकाच वेळी पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळावा आयोजित करण्याचा निर्णय उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. पारंपारीक कारागीर व शिल्पकारांना स्वावलंबी बनविणा-या महत्वाकांक्षी योजनेची प्रगती जनतेसमोर आणणे, योजनेला गती देणे आणि क्षेत्रिय पातळीवरील अडचणी जाणुन घेण्यासाठी या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.
या राज्यस्तरीय उपक्रमाच्या पार्श्वभुमीवर या जिल्ह्याची आकडेवारी सादर करावयाची आहे. जिल्ह्यातील एकुण नोंदणीकृत लाभार्थी तसेच प्रशिक्षण घेत असलेले व पुर्ण झालेले लाभार्थी, बँक कर्ज मंजुरी व प्रत्यक्ष वितरण, टुलकिट वितरीत लाभार्थी यांची आकडेवारी सादर करण्यात येणार आहे. याशिवाय या कार्यक्रमाला सदर योजनेच्या लाभार्थ्यांना आमंत्रित करण्यात करुन, पालकमंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात टुलकिट (साहित्य संच) आणि बँक कर्ज मंजुरी यांचे प्रत्यक्ष वाटप करण्यासाठी जिल्हा ग्रामोद्योग आधिकारी कार्यालयाने महसुल भवन जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे मेळावा आयोजित केला असून सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्ह्याच्या पालकमंत्री व योजनेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहे. तरी विश्वकर्मा लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास हजर राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग आधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
**
No comments:
Post a Comment