Wednesday, 16 September 2026

वसतिगृह, स्वयंम व आधार योजनेसाठी अर्जाची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत

जालना,दि.16(जिमाका) : इतर मागासवर्ग (OBC), विमुक्त जाती (VJNT), भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील (SBC) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक शासनस्तरावरून प्राप्त झाले आहे. त्यानुसार अर्ज सादर करण्याच्या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांना 30 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

शासकीय वसतिगृह योजनेसाठी अर्ज करताना जालना जिल्ह्यातील संबंधित हद्दीअंतर्गत महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या OBC, VJNT, EWS व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांनीच अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हद्दीबाहेरील तसेच तालुक्यातील विद्यार्थ्यांनी संबंधित पात्रतेनुसार पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना (NT-C) किंवा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (OBC, VJNT, SBC) यांसाठी अर्ज करावा.

जालना जिल्ह्यातील व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत HMAS संकेतस्थळावर भेट देऊन परिपूर्ण अर्ज सादर करावा. आधार योजना व स्वयंम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्जाची एक प्रत इतर मागास बहुजन कल्याण, जालना कार्यालयात सादर करावी. विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांनी केले आहे.


**

No comments:

Post a Comment