Wednesday, 16 September 2026

*जिल्ह्यात "पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ" चे आयोजन*


जालना,दि.16(जिमाका) :जिल्ह्यातील रोजगार इच्छुक सुशिक्षित महिला व पुरुष उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या वतीने दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 15 नामांकित महाविद्यालये व संस्थांमध्ये एकाच वेळी "पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ" आयोजित करण्यात आले आहे.


या रोजगार महाकुंभामध्ये २००० पेक्षा अधिक रिक्त पदे उपलब्ध असून, ४० पेक्षा अधिक नामांकित कंपन्या व नियोक्ते सहभागी होणार आहेत. सहभागी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.


या रोजगार महाकुंभामध्ये दहावी, बारावी, विविध पदवीधर, आयटीआय ट्रेडधारक तसेच विविध शैक्षणिक पात्रता व कौशल्य असलेल्या उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. यामध्ये ह्युमन रिसोर्सेस अफिसर, फील्ड असिस्टंट, मॅनेजर, अप्रेंटिस ट्रेनी, असिस्टंट ब्रांच मॅनेजर, संगणक ऑपरेटर, अप्रेंटिस, सेल्स एक्झिक्युटिव्ह, सर्व्हिस अॅडव्हायझर, असिस्टंट टेक्निशियन, फिटर, वेल्डर, सुरक्षा रक्षक, सेल्स एक्झिक्युटिव्ह, डेव्हलपमेंट मॅनेजर, सर्विस सुपरव्हाझर CMYKPY Trainee इत्यादी पदांचा समावेश आहे.


रोजगार महाकुंभ आयोजित करण्यात येणारी 15 ठिकाणे : मॅजिक इन्क्युबेशन सेंटर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना. महर्षी चरक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बदनापूर. पंचायत समिती, बदनापूर, संत ईश्वरसिंग महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मंठा, शासकीय तंत्रनिकेतन, अंबड. डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घनसावंगी, स्व. दत्ताजी भाले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परतूर, स्वातंत्र्य सैनिक पुंडलिक हरी दानवे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकरदन, पंचायत समिती, भोकरदन, झाकीर हुसेन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अन्वा, ता. भोकरदन, जेईएस महाविद्यालय, जालना. मॉडेल महाविद्यालय, घनसावंगी अंकुशराव टोपे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, अंबड. पंचायत समिती कार्यालय, जाफ्राबाद. गोदावरी कला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, अंबड इत्यादी आहेत.


या पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उपलब्ध रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, कंपनीनिहाय माहिती तसेच रोजगार महाकुंभाचा सविस्तर तपशील या विभागाचे संकेतस्थळ https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवरील "पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ" या सदरामध्ये जालना जिल्हा निवडून पाहता येईल.


रोजगार महाकुंभाबाबत काही अडचण किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना येथे कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 02482-299033 वर संपर्क साधावा किंवा ई-मेल: jalnarojgar@gmail.com वर संपर्क साधावा.


जिल्ह्यातील जास्तीत जास्त रोजगार इच्छुक महिला व पुरुष उमेदवारांनी या रोजगार महाकुंभामध्ये सहभागी होऊन उपलब्ध रोजगाराच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.


****


No comments:

Post a Comment