जालना,दि.15 (जिमाका) : सर्व
नागरिक, शेतकरी बंधू-भगिनी आणि हितसंबधीत यांना महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या
मार्गदर्शक सूचनेनुसार, जालना उपविभागात प्रलंबित असलेले महसुली प्रकरणे/ वाद व प्रकरणांचा
त्वरीत व गतिमान पद्धतीने निपटारा करण्यासाठी "महात्मा ज्योतीराव फुले महसूल लोक
अदालत अभियान" आयोजित करण्यात येत आहे. सदर अभियानाअंतर्गत उपविभागीय अधिकारी
कार्यालय, जालना (कचेरी रोड जालना) यांच्या महसुल न्यायालयात प्रलंबित असलेल्या महसुली
प्रकरणांचा आपसी तडजोडीने व गतीने निपटारा करण्यात येणार आहे. उक्त अभियानामध्ये खालील
प्रकरणांचा वादी व प्रतिवादी अपिलार्थी, गैर अपिलार्थी इत्यादीना नोटीस देवुन प्रकरण
प्राध्यान्य क्रमांक ने निकाली काढण्या बाबत शासनाचे निर्देश आहेत.
अभियानाअंतर्गत
खालील प्रमुख बाबींचा निपटारा केला जाणार आहे. फेरफार नोंदी, वारस नोंदी व हक्कसोड
पत्र, अतिक्रमण, शासकीय जमीन, महसुल वसुली तसेच इतर महसूली विषयक प्रकरणामध्ये नियमानुसार
सुनावणी घेवुन पात्र प्रकरणात जलद निपटारा करणे, अपील व पुनरीक्षण महसुली वाद प्रकरणे.
खाते फोड, विषयक प्रलंबित अर्ज. महसुली नोंदीतील दुरुस्ती व इतर महसुली सेवांचे अर्ज.
शेतकऱ्यांचे रस्ते व वहिवाटीबाबतचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे.
तडजोडीसाठी
सुनावणी बुधवार दि. 16 सप्टेंबर, 2026 रोजी, दुपारी 2.00 वाजता उपविभागीय कार्यालय
जालना (कचेरी रोड) जालना. जालना उपविभागातील सर्व संबंधित हितसंबधीत पक्षकार, अर्जदार
व नागरिकांनी आपल्या प्रलंबित महसुली प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी संबंधित
उपविभागीय अधिकारी कार्यालय, जालना येथे विहित कालावधीत संपर्क साधून या अभियानाचा
जास्तीत जास्त लाभ घेण्याचे अवाहन उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले
आहे.
****
No comments:
Post a Comment