जालना,दि.15(जिमाका)
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
संविधानिक पदावरील 25 वर्षांच्या कारकीर्दीनिमित्त तसेच सामान्य नागरिकांपर्यंत विविध
शासकीय सेवा आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ जलदगतीने पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने
17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यभर 'सेवा संकल्प अभियान' राबवण्याचा
निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे
योग्य नियोजन करून ते प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी
आशिमा मित्तल यांनी दिले.
या अभियानाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात
आज संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन आढावा बैठकीत श्रीमती मित्तल या बोलत होत्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी (महसुल) मनीषा दांडगे यांच्यासह
ऑनलाईन जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारीया, जालना महानगर पालिकेच्या
आयुक्त अंजली शर्मा, सर्व उपविभागीय अधिकारी, संबंधीत विभाग प्रमुख यांची उपस्थित होती.
यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी
सांगितले की, या महिनाभराच्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्हा व प्रत्येक तालुकास्तरावर
'सेवा सेतू शिबिरे' आयोजित करण्याचे नियोजन करावे. याद्वारे नागरिकांना विविध शासकीय
योजनांचा थेट लाभ देणे, कार्यालयांमधील प्रलंबित कामांचा गतीने निपटारा करणे, 'नाविन्यपूर्ण
संकल्पना' मांडण्यासाठी इनोव्हेशन चॅलेंज, 'सेवा माझे योगदान', स्वच्छता मोहीम आणि
विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे. या अभियानाचा कालावधी निश्चित असल्याने, सर्व
यंत्रणांनी आपापल्या विभागाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करून हे अभियान यशस्वी करावे. तसेच
राबविलेल्या सर्व उपक्रमाची व्यापक प्रसिध्दी करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
****

No comments:
Post a Comment