जालना,दि.1 (जिमाका) : परतुर जवाहर नवोदय विद्यालय लॅटरल एन्ट्री (वर्ग 9 वी
व 11 वी ) दि. 10 एप्रिल, 2027 साठी अर्ज ऑनलाईन
पद्धतीने भरले जात असुन जिल्हयातील इयत्ता आठवी व इयत्ता दहावी वर्गात सन 2026-27
मध्ये शिकत असणा-या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसह सेवाकेंद्रावरून यंत्रणेचा
वापर करून ऑनलाईन अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2026
अशी आहे.
इच्छुक विद्यार्थी, पालक, शिक्षक व
मुख्याध्यापकांनी हयाची नोंद घ्यावी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी फोटो, स्वाक्ष-या हे 10
ते 100 KB मध्ये स्कॅन करून वर्ग नववी साठी
"https://cbseitms.nic.in/2026/nvsix 9" या संकेतस्थळवरून व अकरावी साठी
https://cbseitms.nic.in/2026/nvsxi 11 संकेतस्थळवरून भरावेत.
जिल्हाभरातील सर्व मुख्याध्यापकांनी
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज
भराण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे
प्राचार्य एस. जी. पदार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment